गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 सप्टेंबर 2019 (10:15 IST)

सांगलीला पुन्हा इशारा कृष्णा नदीची पातळी वाढली, नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा

राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात महापुरामुळे  उद्ध्वस्त केलेले संसार सावरण्यास सुरुवात झाली होती, मात्र त्यात पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली भागातील  नागरिकांची पुन्हा चिंता वाढली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कृष्णा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कोयना धरणातून पाण्याचा 73 हजार 63 क्युसेक्स विसर्ग सुरू असून, पुढील 2 दिवस हा विसर्ग असाच सुरू राहणार आहे, त्यामुळे सांगलीत पाण्याची पातळी  पुन्हा  वाढणार आहे. शहरातील असलेल्या आयर्विन पुलाजवळ सध्या 10 फूट 6 इंच पाणी पातळी आहे. हा विसर्ग असाच सुरू राहिल्यास ती पाणी तापळी 34 फूटावर वाढणार आहे. आयर्विन पुलाजवळ इशारा पातळी 40 फूट, तर धोका पातळी 45 फूट आहे. पाणी नदी पात्रामध्येच रहाणार असले, तरी नदीकाठच्या विशेषत: वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील आणि महानगरपालिका क्षेत्रातील लोकांना यामुळे धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीपात्रात जावू नये, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्यात.