रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 सप्टेंबर 2019 (10:08 IST)

पावसात अडकले मुंबईकर भुकेने व्याकुळ, गणपती बाप्पा आले मदतीला

मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे, त्यामुळे तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेनची वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. या न थांबता कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबईमधील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प होती. तर अनेक मुंबईकर वेगवेगळ्या स्थानकांमध्ये अडकून पडले होते, याच अडकलेल्या मुंबईकरांनाच्या मदतीसाठी गणेश मंडळे पुढे आली आहेत. यामध्ये परळचा राजा नरेपार्क मंडळाने अडकलेल्या मुंबईकरांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय केली आहे. मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ पाटकर यांच्या नावाने यासंदर्भातील मेसेज व्हायरल झाला आहे.
 
मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवासी अडकले, दादर, परळ, माटुंगा स्थानकातही मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकले आहेत. या प्रवाशांच्या मदतीसाठी ‘परळचा राजा नरेपार्क’ मंडळाकडून जेवणाची सोय केलेली आहे. मुंबईकरांनी कुठलीही तमा न बाळगता परळ चा राजा नरेपार्क गणपती मंडपाजवळ संपर्क करावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ पाटकर यांनी केले आहे. त्यामुळे फक्त पैसे घेणारे मंडळ न राहता परळच्या राजाने खऱ्या अर्थाने मदत केली आहे.