1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईत संततधार सुरुच, ऑरेंज अलर्ट

heavy rain in Mumbai
मुंबईत पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पावासाची संततधार सुरुच आहे. यामुळे लोकांच्या समस्या वाढल्या आहे. जागोजागी पाठी साचत आहे. मागील 24 तासात जोरदार पाऊस पडला आहे. हवामान खात्याने 6 सप्टेंबरपर्यंत मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आले आहे, जेव्हाकि दुपारी हायटाइड अलर्ट जाहीर केले गेले आहे.
पावसाची रिपरिप सुरुच असल्यामुळे रस्ते वाहतुकीचाही वेग मंदावला आहे. पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून बेस्ट बसांचे रुट परिवर्तित करण्यात आले आहे.
बीएमसीने बुधवारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. हार्बर लाइनवर ट्रेन उशिराने धावत आहे आणि काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
गणेशोसत्वामुळे अनेक लोकं रस्त्यावर असल्यामुळे समस्या अधिकच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उंच लाटांमुळे बीएमसीने लोकांना समुद्राजवळ जाऊ नये अशी चेतावणी जाहीर केली आहे.