भाजपचा डबल ढोल, रोहित पवार यांची जोरदार टीका
गरज पडली की सल्ला घ्यायचा, बारामतीत येवून कौतुक करायचं आणि निवडणुका आल्या की काय केलं विचारायचं. हा भाजपचा नेहमीचा डबल ढोल वाजवण्याचा प्रकार असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. यासाठी त्यांनी फेसबुक पोस्ट टाकत भाजप डबल ढोल असल्याची घणाघाती टीका केली.
रोहित पवार म्हणाले, “शरद पवारांचं राजकारण म्हणजे कुणीही उठावं आणि बोट दाखवावं असं निश्चितच नाही. गेल्या 50 वर्षात तीन पिढ्यांनी पाहिलेलं हे राजकारण आहे. त्यांच्यामुळे शेतकऱ्याने शेतीतून चार पैसे कमावले. त्यांच्या मुलाने तालुक्याच्या ठिकाणी चांगले शिक्षण घेवून नोकरी केली. त्याचा नातू आज IT कंपनीत नोकरी करु शकतो. अशाप्रकारे शरद पवारांच्या राजकारणाची शृंखला शेतीपासून ते IT पार्क उभा करण्यापर्यंतची आहे.”