मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 जुलै 2019 (09:52 IST)

शरद पवारांचे नातू रोहित पवार अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दुसरा नातू आता निवडणुकीत उभा राहतो आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यानंतर आता रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागण्यासाठी अर्ज केला आहे. जिल्हा परिषद सदस्य असलेल्या रोहित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारी मागितली असून, विधानसभा लढवण्यास मी इच्छुक असल्याचं रोहित पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले असून, मात्र अनेक मतदारसंघांमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. रोहित पवार यांनी उमेदवारी मागितलेल्या मतदारसंघातच दोघांनी अर्ज दाखल केले आहेत. सोबत पारनेर, शेवगाव या मतदारसंघातही एकापेक्षा जास्त अर्ज आले आहेत. नगर जिल्ह्यात विधानसभेचे 12 मतदारसंघ असून, आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेल्या मतदारसंघांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.