IRCTC वेबसाइट नवीन रूपात, यूजर्सला मिळतील या 5 सुविधा
भारतीय रेल्वेने IRCTC च्या वेबसाइटला नवीन रूप दिले आहे आणि यात यूजर्सच्या कामाचे अनेक फीचर देखील जोडले आहेत. एक नजर वेबसाइट यूजर्सला मिळणार्या 5 सुविधांवर...
तिकिट बुकिंग करणे झाले सोपे
नवीन वेबसाइटमध्ये तिकिट बुकिंगची प्रक्रिया अजून सोपी झाली आहे. प्रवाशांना ‘Separate card’ दिले गेले आहे, ज्यात ते आपल्या गरजेप्रमाणे माहिती भरू शकतात. आधीपासून डिटेल असल्यामुळे तिकिट बुक करताना अपेक्षाकृत कमी वेळ द्यावा लागतो.
लॉग इन विना ही सुविधा
IRCTC वेबसाइटमध्ये सर्वात मोठी सुविधा म्हणजे यूजर्स लॉग-इन न करता देखील सीट्सची उपलब्धता तपासू शकतात.
वेटलिस्ट प्रिडिक्शन टूल
या नवीन टूलद्वारे यूजर्स आपली वेटलिस्ट तिकिट किंवा RAC तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता तपासू शकतात.
हे फीचर आहे खूप खास
या वेबसाइटमध्ये ‘Vikalp’ नावाने एक नवीन फीचर देण्यात आले आहे. या द्वारे वेटिंग लिस्ट असणार्या प्रवाशांना अल्टरनेट ट्रेनमध्ये कन्फर्म सीट निवडण्यास मदत मिळते.
ट्रॅव्हल प्लान करण्यात मदत
नवीन वेबसाइटवर प्रस्थान समय, आगमन समय, ट्रेन आणि कोटा या सारखे अनेक नवीन फिल्टर प्रवाशांना ट्रॅव्हल प्लान तयार करण्यात मदत करतील.