बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 11 एप्रिल 2019 (16:34 IST)

व्हाट्सएप वापरकर्ते एका वेळी 30 लोकांना पाठवू शकतील फाइल

फेसबुक मालकी असलेल्या व्हाट्सएपने ऑडिओ पिकर फीचर घोषित केले आहे, जे नवीन यूजर इंटरफेससह येते. या नवीन अपडेटच्या अंतर्गत वापरकर्ता एका वेळी 30 ऑडिओ फायली पाठविण्यास सक्षम असतील. यापूर्वी एका वेळेत फक्त एक ऑडिओ फाइल पाठवली जाऊ शकत होती. हा नवीन फीचर 2.19.89 बीटा अपडेटचा भाग आहे. 
 
अलीकडे व्हाट्सएप फेक न्यूज आणि चुकीची माहिती पसरवणे थांबविण्यासाठी नवीन फीचरचा तपास करत आहे आणि काही फीचर अगोदरच लॉन्च देखील करण्यात आले आहे. आधीपासूनच व्हाट्सएप फेक न्यूज आणि चुकीची माहिती पसरवणे थांबविण्यासाठी एक कँपनं चालवत आहे. 
 
इन्स्टंट मेसेजिंग एप व्हाट्सएप बहुप्रतीक्षित आयपॅड सपोर्टवर कार्यरत आहे जे Touch ID सह मिळून काम करेल. हे स्प्लिट स्क्रीन आणि लॅंडस्केप मोड दोन्ही मध्ये काम करेल, ज्यासाठी तपासणी सुरू आहे. त्या शिवाय खोट्या बातम्या कमी करण्यासाठी व्हाट्सएप फॉरवर्ड इन्फो आणि फ्रिक्वेंटली फॉरवर्ड मेसेज फीचरची तपासणी करत आहे.