गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

काय आहे हे ऑडियो क्लिप प्रकरण, मुख्यमंत्री म्हणे मीच ती क्लिप निवडणूक आयोगाला देणार

Maharashtra CM audio-clip
मुख्यमंत्री यांच्या ऑडियो क्लिप वरुन राज्यात वातवरण तापलेले असताना, खुद मुख्यमंत्री यांनी ही संपूर्ण क्लिप ऐकवली आहे. उलट मीच आयोगाला ही देणार असे सागितले आहे. त्यामुळे आता याला शिवसेना काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे. मुख्यमंत्री   वसईत बोलत होते, तेम्हनाले की   पराभव दिसतोय म्हणूनच शिवसेना खालच्या पातळीवर उतरली असून,  जनतेची दिशाभूल करण्यासाठी शिवसेनेने माझी ऑडिओ क्लिप मोडून- तोडून सादर करत समोर आणली आहे.  संपूर्ण ऑडिओ क्लिप 14 मिनिटांची आहे. मी स्वत: ती क्लिप निवडणूक आयोगाकडे देणार आहे", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 
 
मुख्यमंत्र्यांनी जारी केलेली ऑडिओ क्लिप
 
एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता... आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल, तर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट केलं पाहिजे?
 
ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे, तो आता शांत बसूच शकत नाही
 
आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे
 
ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा...
 
साम, दाम, दंड, भेद...
 
ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही.
 
कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
 
तेव्हा तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे.
 
'अरे ला कारे'च करायचं..
 
'अरे ला कारे' मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे
 
चिंता करु नका. आपण सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी सक्षम आहोत.