अमोल यादव यांच्या विमानाचे रजिस्ट्रेशन झाले
अमोल यादव यांचं स्वदेशी बनावटीचं विमान झेपावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन विभागानं अमोल यादव यांच्या विमानाचं रजिस्ट्रेशन करुन घेतलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भातलं पत्र अमोल यादव यांना देणार आहेत. मेक इन इंडिया अंतर्गत तयार केलेल्या अमोल यादव त्यांच्या सहाआसनी विमानाची परवानगी तांत्रिक कारणामुळे रखडली होती.
विमानाच्या नोंदणीसाठी होणाऱ्या दिरंगाईवर विमान प्राधिकरणाची थेट पंतप्रधान कार्यालयाकडून कानउघाडणी झाली होती. मुंबईतील चारकोपमधल्या घराच्या छतावर अहोरात्र मेहनत करुन अमोल यादव यांनी तयार केलेलं विमान केवळ डीजीसीएची नोंदणी होत नसल्यानं उड्रडाणापासून रखडलं होतं. अखेर यादव यांच्या विमानाची नोंदणी पूर्ण झाली.