मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुख्यमंत्र्यांच्या 'मन की बात' वर 4 कोटींचा खर्च

राज्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मी मुख्यमंत्री बोलतोय', 'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' हे कार्यक्रम दूरचित्रवाणीवर सुरू केले आहेत. या कार्यक्रमांच्या प्रत्येक भागावर 27 लाख 9 हजार 400 रूपये खर्च करण्यात येत असून संपूर्ण वर्षात त्यावर 4 कोटी 45 लाख 12 हजार आठशे रूपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधण्यासाठी रेडिओवरून 'मन की बात' हा कार्यक्रम सुरू केला. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री दूरचित्रवाणीवर 'जय महाराष्ट्र' 'दिलखुलास' आणि 'मी मुख्यमंत्री बोलतोय' हे कार्यक्रम सुरू केले आहेत. महिन्यातून दोनदा हा कार्यक्रम दूर चित्रवाणीवर दाखविण्यात येतो. वर्षाला त्याचे एकूण 24 भाग प्रसारित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे चित्रीकरण, चित्रीकरणाचे क्रोम करणे, कलर करेबशन, मॉन्टेज म्युझिक, मेकअप, लाईटमन, प्लोअर मनसह कार्यक्रमाची निर्मिती आणि चित्रीकरणासाठी एकूण 4 कोटी 45 लाख 12 हजार 800 रूपये खर्च होणार आहेत. या खर्चाच्या मंजुरीसाठी राज्य सरकारने 5 ऑक्टोबर रोजी परिपत्रक काढले आहे.