बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

'मन की बात' ऐवजी करा 'गन की बात': उद्धव ठाकरे

मुंबई- पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसून हल्ला केल्याच्या घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. आता मोदींनी मन की बात बंद करून गन की बात करावी, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
 
मुंबईत रंगशारदामध्ये शिवसेनेचा प्रशिक्षण मेळावा असून या मेळाव्यात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी जम्मू काश्मीरमधील घटनेवर प्रतिक्रिया दिली. काश्मीर पेटलेला आहे. मोदींनी आता गन की बात केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. जम्मू काश्मीरमधील पूँछमधील किरपान येथे पाकिस्तानच्या बॅट तुकडीने भारतीय जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले होते.
 
पाकच्या सैनिकांनी भारतीय जवानांचे शिर कापण्यचा नृशंस प्रकार केला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.