शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

जिल्हा मध्यवर्ती बॅंका शिखर बॅंकेत विलीनीकरण करा : मुख्यमंत्री

आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांचे शिखर बॅंकेत विलीनीकरण करा असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरीप आढावा बैठकीत व्यक्त केले.

शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपाचा आढावा घेत असताना त्यांनी सहकार विभागाला सूचना दिल्या. जिल्हा बॅंका डबघाईला आल्याने पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य पूर्ण होत नाही. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मत मांडलं. राज्यातील 31 बॅंकांपैकी 11 बॅंका तोट्यात असून त्यापैकी 9 बॅंकांची स्थिती अत्यंत नाजूक आहे, त्याच पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सहकार विभागाला सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे.