गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

विश्वचषक फुटबॉल: "महाराष्ट्र मिशन 1 -मिलीयन"

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी  महाराष्ट्रात आज एकाच दिवशी 10 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार असून, शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता मुंबई जिमखाना, फोर्ट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते "महाराष्ट्र मिशन 1 -मिलीयन" या फुटबॉल खेळाच्या महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले आहे. 
 
या स्पर्धेकरिता  बॉम्बे जीमखाना  आठ वेगवेगळे सामने होणार असून मुंबई जिमखाना येथे मुलींचा संघ,मुलांचा संघ, मुंबईचे डबेवाले, क्रीडा पत्रकार विरुध्द राजकीय पत्रकार, नॅशनल ब्लाईंड असोसिएकशन विद्यार्थी, पालघर येथील आदिवासी संघ असे फुटबॉलचे सामने खेळले जाणार आहेत. याद्वारे खेळाकडे आपला योग्य असा वातावरण निर्मिती कशी होईल हे पाहणे असून फुटबॉल ला प्रसिद्धी देणे सुद्धा आहे.