बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: हैदराबाद , मंगळवार, 5 सप्टेंबर 2017 (12:57 IST)

गोपीचंद अॅकॅडमीत सायना नेहवालचे प्रशिक्षण सुरु

तीन वर्षांच्या दुराव्यानंतर राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने त्यांचे मतभेद संपुष्टात आणले आहेत. विश्वचषक बॅडमिंटन स्पर्धेनंतर सायनाने गोपीचंद अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षणास सुरुवात केली आहे. सायनाने यापूर्वी या अॅकॅडमीतून प्रशिक्षण घेणे बंद केले होते व 2 सप्टेंबर 2014 रोजी ती विमल कुमार यांच्या बंगळुरू येथील अॅकॅडमीत दाखल झाली होती. विमलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तिने जगात अव्वलस्थान घेतले होते. तसेच दोन जागतिक स्पर्धेत पदक मिळविले होते.