बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: ग्लासगो , सोमवार, 28 ऑगस्ट 2017 (09:11 IST)

पी.व्ही.सिंधूला रौप्यपदक जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. अंतिम फेरीत जपानच्या नोझुमी ओकुहाराने सिंधूचा २१-१९, २०-२२, २२-२० असा पराभव केला.
 
नोझुमी ओकुहारा आणि सिंधू यांच्यातला सामना खूप अटीतटीचा झाला. सुरुवातीला सिंधूने आपल्या खेळात बदल करत आक्रमक स्मॅश फटक्यांचा वापर केला. सिंधूच्या या आक्रमक खेळापुढे नोझुमी ओकुहारा काहीशी बॅकफूटला गेलेली पहायला मिळाली.   नोझुमी ओकुहाराने महत्वाच्या क्षणी सिंधूची सर्विस ब्रेक करत तिला  मागे टाकलं. यात सिंधूकडून झालेल्या काही सध्या चुकांचीही भर पडली.
 
रियो ऑलिम्पिक नंतर पुन्हा एकदा सिंधू वर संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.