बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सिडनी , गुरूवार, 22 जून 2017 (11:29 IST)

ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटनमध्ये कश्यपसमोर कठीण आव्हान

भारताच्या पी. कश्यपने पात्रता फेरीत सहज विजय साजरा करून ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटनच्या मुख्य स्पर्धेत प्रवेश केला असला तरी त्यासमोर पहिल्याच फेरीत कडवे आव्हान आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या कोरियाच्या सोन वान होविरुद्ध कश्यपला झुंज द्यावी लागेल. 
 
दुखापतींमुळे अनेक स्पर्धांना मुकलेल्या कश्यपने पात्रता फेरीत चीनच्या झाओ जुनपांगवर 21-15 आणि 
21-18 असा विजय साजरा केला. त्यानंतर इंडोनेशियन ओपनचा उपविजेता जपानच्या काझुमासा साकाईवर 21-5 आणि 21-16 अशी दणदणीत मात केली. इंडोशियन ओपनचे अजिंक्यपद पटकावणार्‍या के. श्रीकांतसमोर पहिल्या फेरीत चायनिज तैपेईच्या कान युचे आव्हान असेल. एच.एच. प्रणॉलाही मुख्य स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला असून इंग्लंडच्या राजीव ओस्पेविरुद्ध त्याची पहिली लढत होईल.  महिला एकेरीत ऋत्तिका गड्डेने ऑस्ट्रेलियाच्या सेलविनावर 21-15, 21-15 तर रुविंदीवर 21-9, 21-7 असे नमवून मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरली. भारताची आणखी एक खेळाडू शिवानीची लढत चीनच्या चांगविरुद्ध होईल. सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू आणि साई प्रणिथ यांच्या पहिल्या लढतीत बुधवारी रंगणार आहेत.