बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

कर्जमाफीची घोषणा फोल: विखे पाटील

मुंबई- 1 ऑक्‍टोबरपासून कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची सरकारची घोषणा फोल ठरली असून, दिवाळीपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासनही सरकार पाळू शकलेले नाही. शेतकऱ्यांची दिवाळी अंधःकारमय करणाऱ्या या सरकारला आता शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचाही नैतिक अधिकार राहिलेला नाही, अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
 
दिवाळीपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने आता घुमजाव केले आहे. बॅंकांकडून माहिती न आल्यामुळे दिवाळीपूर्वी कर्जमाफी शक्य नसल्याचे सहकार मंत्र्यांनी म्हटले आहे.राज्‍यातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा दिमतीला असताना सरकारशेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती जमा करू शकत नसेल तर हे सरकारचे राज्यावर नियंत्रण नसल्याचे प्रतिक आहे.
 
नांदेड महानगर पालिकेत काँग्रेसपक्षाला मिळालेले अ‍भूतपूर्व यश हे सरकारच्‍या विरोधातील असंतोषाचाउद्रेक असून, मतदारांनी सरकारला एकप्रकारे धडा शिकवला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालासंदर्भात सोशल मीडियावरूनभारतीय जनता पक्षाने चुकीची आकडेवारी मांडली. पण या निवडणुकीत देखील काँग्रेस पक्षानेच सर्वाधिक जागा जिंकल्‍या, ही वस्तुस्थिती असल्याचे विरोधीपक्षनेत्यांनी सांगितले. 
 
सरकारच्या करणी अन् कथनीतमोठा फरक असल्‍याचे आहे. फवारणीतून विषबाधा झाल्यानेयवतमाळमध्‍ये 19 शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतरही कृषिमंत्री तिथे तातडीने पोहचू शकले नाही. या सरकारनेशेतकऱ्यांचा जीव स्‍वस्‍त करून ठेवला आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली व अनेकांचा हकनाक जीव गेल्यानंतर सरकारला जाग आली, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.