1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सी एम काय आकडे देतात, खत्री कडे कामाला होते का: राज ठाकरे

Raj Thackeray
राज ठाकरे आता पुन्हा सक्रीय झाले असून त्यांनी पुन्हा शेकली भाषेत सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री यांनी सरकार ने केलेल्या कामांची यादी दिली आहे त्यावर राज यांनी सातारा येथे अर्थ संकल्प आणि सरकारवर जोरदार टीका केली.
 
राज म्हणतात की "आता मुख्यमंत्री पुन्हा एकदा विकासकामांच्या बाबतीत रोज नवे समोर ठेवत आहेत  ते काय रतन खत्रीकडे कामाला होते का?, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. सातारा येथे पदाधिकारी मेळावा होता त्यात राज संबोधित करत होते. या दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री यांच्या पाठोपाठ  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या खास शैलीत शाब्दिक त्यांची टर उडवली आहे. रतन खत्री हा एके काळचा मटका किंग होता. राज यांनी कंद्र सरकारवर आणि नरेद्र मोदी यांच्यावर टीका केली ते म्हणाले की मोदींचं हे शेवटचं बजेट आहे. आज तेवढ्या वेळात आपला हिशोब आटोपून घेऊ, अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली. निवडणूक जिंकण्यासाठी शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घेतलं जातं. पुढाऱ्यांनी जातीपातीच्या राजकारणात महाराष्ट्राला अडकवून वाटोळं केल्याचंही राज म्हणाले आहेत.
 
राज्यात माथी भडकवुन जातीपातीच राजकारण करण्याचा उद्योग महाराष्ट्रात सुरु असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.