1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

धुळे : पोलीस निरिक्षकांची आत्महत्या

dhule news
धुळ्यामध्ये  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक रमेशसिंग परदेशी  सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रमेशसिंग यांच्या सेवा निवृत्तीला अवघे ४ महिने शिल्लक राहिले होते. मात्र, रात्री त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस त्यांच्या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
 
शहरातले डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. धुळ्यातील कुख्यात गुंड गुड्ड्या शेख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती.