रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे (६८) यांचं दीर्घ आजाराने निधन झाले आहे.  मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डावखरे यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
वसंत डावखरे हे ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते होते. 1986 साली त्यांनी ठाणे महापालिकेतून नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. पुढे 1987 साली ते ठाण्याचे महापौरही झाले. 1992 पासून ते चारवेळा महाराष्ट्राच्या विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून गेले. सर्वच पक्षातील नेत्यांशी राजकारणाच्या पलिकडे त्यांचं सुसंवादाचं नातं होतं. 
 
वसंत डावखरे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांचा राजकारणाशी संबंध आला.1986 साली ठाणे महापालिकेची स्थापना झाली. त्यानंतर पहिल्याच निवडणुकीत ते नौपाड्यातून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून विजयी झाले. 1986-1987 साली ते ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर ते ठाण्याचे महापौरही झाले. 1992 पासून सलग चारवेळा ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. 1998 मध्ये विधान परिषदेच्या उपसभापतीपदी त्यांची एकमताने निवड झाली. सलग 18 वर्षे ते उपसभापती होते.