बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

संघ व भाजप दलितविरोधी असल्याचे ठळक उदाहरण

भीमा कोरेगावच्या घटनेने संघ आणि भाजप दलितविरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
 
राज्यभरात सध्या भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेवरुन मोठा तणाव निर्माण झाला आहे. राजकीय वर्तुळातही या सगळ्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट करुन भीमा कोरेगावच्या घटनेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला जबाबदार धरले.
 
समाजात दलित हे सगळ्यात खालच्या स्तरावर राहिले पाहिजेत, हा संघ आणि भाजपच्या फॅसिस्ट विचारसरणीचा मुख्य गाभा आहे.