बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

आज महाराष्ट्र बंद

मुंबई- संभाजी भिडे यांचे शिव प्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे यांच्या हिंदू एकता आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भीमा- कोरेगावच्या विजयस्तंभाकडे आलेल्या जमावावर दगडफेक केली, हिंसाचार भडकवला असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 
 
प्रशासन आणि गावकर्‍यांच्या भांडणातून हा प्रकार घडला आहे, विजयस्तंभावर आलेल्या लोकांचा सणसवाडी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज शांततापूर्ण महाराष्ट्र बंदचे आवाहन भारिपने केले आहे. तसेच, हिंदुत्ववादी संघटनांना कारस्थानात मदत केल्याबद्दल कोरेगाव ते शिरुर आणि कोरेगाव ते चाकण या परिसरातील गावांचे सरकारी अनुदान दोन वर्षांसाठी बंद करण्याची मागणीही डॉ. आंबेडकर यांनी केली.