शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अवघे गाव झाले दारूने झिंगाट

हो एक पूर्ण गावच दारू मुळे चांगलेच झिंगले आहे. हा सर्व प्रकार घडला आहे जळगाव जिल्ह्यातल्या निमखेडी नावाच्या गावात.पोलीस कारवाई करतील लढवलेल्या एका शक्कले मुळे हा प्रकार घडला आहे. यामध्ये भट्टीची दारू वर कारवाई होणार म्हणून दारु बनवणाऱ्यांनी पोभीतीनं बनवलेली दारू गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या  विहीरीत ओतून टाकली होती. सकाळी जेव्हा पाणी पुरवठा झाला तेव्हा ही पाणी पिल्याने निमखेडी गाव चांगलेच  झिंगले होते. गावातील सर्व आबाल वृद्धांना मदिरेची चव मिळली आहे. मात्र यामुळे अनेकांना उल्ट्या जुलाब सुद्धा  झाले आहेत. गावातील अनके नागरिकांचा अख्खा दिवस नशेतचा गेला आहे.  मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रच्या सीमेवरचं हे गाव पाचोरा तालुक्यात आहे. 
 
गावच्या ग्रामपंचायतीनं पाण्यासाठी विहीर बांधलीय आहे. या विहिरीतून नळयोजनेद्वारे  पाणी पुरवठा नेहमी प्रमाणे केले होता. मात्र  पाण्याला उग्र वास येत होता असे दिसून आले , पण क्लोरिन जास्त झालं असावं असा गावातील लोकांनी  कयास लावला आणि  पाणी प्राशन केलं.  त्याच नशेत अनेक जण झोपून गेले गावतल्या काही नागरिक विहिरीकडे गेले तपास केला असता  दारुचा उग्र वास आलाआणि सगळा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरु आहे.