बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सहा महिन्याच्या चिमुरडीला सलमान खानची मदत

सलमान खान
जळगावात रक्तवाहिनीच्या विकाराने त्रस्त असलेल्या ओवी सुर्यवंशीला सलमान खानने मदतीचा हात दिला आहे. सहा महिन्यांच्या ओवीवर उपचारासाठी लागणाऱ्या साडेसहा लाखांचा खर्च उचलण्याची तयारी सलमान खानने दाखवली. गेल्या काही महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देत होती. तिच्यावरील उपचारांसाठी साडेसहा लाख रुपये खर्च लागणार होता. मात्र शेतकरी असलेल्या सुर्यवंशी कुटुंबाकडे इतकी मोठी रक्कम नसल्यानं त्यांनी तिच्या उपचारासाठी शेत गहाण ठेवलं. 
मुंबईत ओवीवर उपचार करण्याचे प्रयत्न सुरु असताना चक्क अभिनेता सलमान खान मदतीला धावून आला. सलमानने तिच्या संपूर्ण उपचाराचा खर्च केल्याने ओवीला  जीवदान तर मिळालंच, शिवाय त्यांची शेतीसुद्धा कायम राहिली आहे.