मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

सातही दिवस दुकाने सुरु ठेवा, मात्र कामगारांना आठवडी सुट्टी द्या

राज्यातील दुकानं आणि आस्थापनांना आठवडयातील सात दिवस व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र तिथल्या कामगारांना आठवडयातून एक दिवस साप्ताहिक सुट्टी देणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र दुकानं आणि आस्थापना अधिनियम 2017 कालपासून (19 डिसेंबर) संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे.
 
शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व मोठया व्यवसायांना तसंच आस्थापनांना हा अधिनियम लागू झाला आहे. शहरांसह ग्रामीण भागातील अनेक आयटी आणि इतर आस्थापनांना हा अधिनियम लागू होत असल्याने, तिथल्या कामगारांना याचा फायदा होणार आहे.
 
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीमुळे ऑनलाईन व्यवसाय 24 तास कार्यरत असतात. त्यामुळे ऑफलाईन व्यवसाय करणाऱ्या व्यायसायिकांना त्यांच्याशी सकारात्मक स्पर्धा करता यावी म्हणून हा कायदा लागू करण्यात आला आहे. या अधिनियमाअंतर्गत दहापेक्षा कमी कामगार आहेत अशा तसंच लघु आणइ छोट्या आस्थापनांना नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी त्यांनी व्यवसाय सुरु केल्याबाबत केवळ विहीत कागदपत्रासह व्यवसाय सुरु केल्याची ऑनलाईन सूचना द्यावी लागणार आहे. त्या अर्जाची पावती ऑनलाईन उपलब्ध होईल.