रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

'ही' बहुप्रतीक्षित मुलाखत पुन्हा एकदा रद्द

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची राज ठाकरे घेणार असलेली बहुप्रतीक्षित मुलाखत पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे. कोरेगाव- भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांकडून हा निर्णय घेण्यात आलाय. याआधी देखील पवारांच्या कार्यव्यग्रतेमुळे ३ जानेवारी रोजी होणारी ही मुलाखत रद्द करून तिचे नियोजन ६ जानेवारी करण्यात आले होते. 
 
जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी ही माहिती दिली आहे. ६ जानेवारीस सायंकाळी ५ वाजता बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात पवारांची ही मुलाखत होणार होती.आता ती अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.