शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

डीएसके कुणाचे पैसे बुडवणार नाहीत: राज ठाकरे

‘डीएसके चिटर नाहीत, ते अडकले आहेत. त्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मराठी माणसांनी पुढे यावं असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलय. डीएसके कुणाचे पैसे बुडवणार नाहीत, ठेवीदारांनी त्यांना सहकार्य करावं अस राज यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले की, ‘ काही राजकीय पुढाऱ्यांशी संबंधित अमराठी लोक त्यांना उध्वस्त करु पहात आहेत. तसे होऊ नये याची खबरदारी आपण घ्यायला पाहीजे’ असंही राज म्हणाले. अडचणीत असलेल्या डीएसकेंच्या पाठी उभं राहण्यासाठी काही ठेवीदार एकवटले आहेत. राज ठाकरे यांनी आज त्यांची पुण्यात बैठक घेतली. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे डीएसकेंना मोठा दिलासाही मिळणार आहे.