1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 डिसेंबर 2017 (16:48 IST)

राज ठाकरे घेणार शरद पवार यांची मुलाखत

raj thakare sharad panwar
मनसे प्रमुख राज ठाकरे हे शरद पवारांची मुलाखत घेणार आहे. राज आणि शरद पवार यांचे जुने सबंध असून पवार ठाकरे यांना अनेकदा सल्ले सुद्धा देत असतात. यावेळी मात्र  राज ठाकरेंना वेगळ्या म्हणजेच मुलाखतकाराच्या भूमिकेत पाहण्याची संधी  मिळणार आहे. पुण्यात 3 जानेवारी रोजी हा कार्यक्रम होणार आहे. शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली तसेच त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.  राज ठाकरे शरद पवारांची मुलाखत घेणार असल्याने ही मुलाखत रंगतदार होणार आहे. शरद पवार यांनी आपली राजकीय खेळी कधीच उघड केली नाही. ते आधी करतात मग परिणाम दिसून येतो असे अनेकदा झाले आहे.त्यामुळे या मुलाखतीतुन अनेक गोष्टी समोर येथील असे तर अनेकांना वाटत आहे.   राज ठाकरे यांना जे बोलायचं आहे ते समोरच्याला थेट आणि स्पष्ट सांगणं हा त्यांचा स्वभाव. त्यामुळे ही मुलाखत उत्तम होणार हे नक्की.