1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
  4. Sarojini Naidu Death Anniversary

Sarojini Naidu Death Anniversary सरोजिनी नायडू पुण्यतिथी

Sarojini Naidu
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर नेत्या आणि 'भारताची कोकिळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरोजिनी नायडू यांची आज पुण्यतिथी आहे. तसेच त्यांचे २ मार्च १९४९ रोजी त्यांचे निधन झाले.  

'भारत कोकिला' नावाने प्रसिद्ध असलेल्या श्रीमती सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 ला हैद्राबाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अघोरनाथ चट्टोपाध्याय होते. जे एक प्रसिद्ध वैज्ञानिक आणि शिक्षाशास्त्री होते. तसेच त्यांच्या आईचे नाव वरद सुंदरी होते. वरद सुंदरी या कवियित्री होत्या. त्या बंगाली भाषेत कविता लिहायच्या. सरोजनी नायडू यांनी वयाच्या 14 वर्षी सर्व इंग्रजी कवींच्या रचनांचे अध्ययन केले होते.

सरोजिनी नायडू: एक अष्टपैलू व्यक्तिमत्व
राजकीय नेतृत्व: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष म्हणून त्यांनी धुरा सांभाळली (१९२५, कानपूर अधिवेशन).

स्वातंत्र्यलढा: सविनय कायदेभंग चळवळ आणि 'भारत छोडो' आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. धरसाना सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी अत्यंत धैर्याने केले.

पहिली महिला राज्यपाल: स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा बहुमान त्यांना मिळाला.

साहित्यिक योगदान: त्यांच्या कवितांमधील लय आणि माधुर्यामुळे त्यांना 'भारताची कोकिळा' ही पदवी मिळाली. 'द गोल्डन थ्रेशोल्ड' (The Golden Threshold) हा त्यांचा प्रसिद्ध कवितासंग्रह आहे.

2 मार्च 1949 ला वय 70 वर्ष ह्रदय विकारच्या झटक्याने सरोजनी नायडू या अनंतात विलीन झाल्या. वयाच्या 13 व्या वर्षी त्यानी 1300 ओळींची 'द लेडी ऑफ लेक' कविता लिहली होती. तसेच फारसी भाषेमध्ये 'मेहर मुनीर' हे नाटक लिहले. 'द बर्ड ऑफ टाइम', 'द ब्रोकन विंग', 'नीलांबुज', ट्रेवलर्स सांग' ही त्यांची प्रकाशित पुस्तकें आहेत.

विचार
"देशाची मुक्ती ही केवळ पुरुषांच्या हातात नसून, जोपर्यंत महिला खांद्याला खांदा लावून उभी राहत नाही, तोपर्यंत पूर्ण स्वातंत्र्य मिळणार नाही."
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
LIVE: मुंबई ते विजयदुर्ग दरम्यानची बहुप्रतिक्षित रो-रो सेवा सुरू झाली