बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नाणार भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आलेली नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नाणार येथील प्रकल्पासाठी निर्देशित करण्यात आलेल्या भागाला भेट दिली. त्यावेळी उपस्थित प्रकल्पग्रस्तांना संबोधित करताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, " नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा हे उद्योगमंत्र्यांचे वैयक्तिक मत आहे. प्रत्यक्षात ही अधिसूचना रद्द करण्यात आलेली नाही. अशी अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार हा मुख्य सचिव समितीला असतो. मात्र सध्या तरी अधिसूचना रद्द करण्याच कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. नाणार प्रकल्पासंदर्भात राज्य आणि कोकणच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल" असे सांगितले.