1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Raj Thackeray opposes Nanar oil refinery project

नाणारमध्ये प्रकल्प होऊ देणार नाही म्हणजे नाहीच : राज ठाकरे

कोणत्याही परिस्थितीत  नाणारमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही म्हणजे नाहीच, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला. ‘नाणारमधील प्रकल्पामुळे कोकणाचं नुकसान होईल. त्यामुळेच कोकणवासी या प्रकल्पाविरोधात आहेत. मात्र फक्त पैशांसाठी या भागात जमिनी खरेदी करणाऱ्या लोकांना हा प्रकल्प हवा आहे. प्रकल्पासाठी जमिनी विकून पैसा कमावता यावा, यासाठी नाणारमध्ये भाजप नेत्यांच्या नातेवाईकांनी जमिनी खरेदी केल्या आहेत,’ असा थेट आरोप राज यांनी केला.
 
मुलुंडमधील सभेत राज यांनी भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. भारतीय जनता पक्ष बलात्काऱ्यांच्या पाठीशी उभी राहत आहे’, असे सांगत मनसे अध्यक्ष यांनी काश्मीरमधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणांवरून भाजपावर टीका केली.  
पुढील लेख
कठुआ बलात्कार, आज स्थानिक न्यायालयात सुनावणी