शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 14 एप्रिल 2018 (15:37 IST)

राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शेलार आज सकाळीच राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’वर गेले होते. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती अजूनही समोर आलेली नाही. मनसे किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्याने यासंदर्भात माहिती दिली नाही. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात अचानक व गुप्तपणे झालेल्या या भेटीमागे नक्की काय कारण असेल, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. याबाबतचे वृत्त एका खासगी वृत्त वाहिनीने दिले आहे.