सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मनसैनिकांचे मुंबई-अहमदाबाद मार्गावर आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील शिवाजी पार्कवरून मोदी मुक्त भारत ही घोषणा केली.  भाषणात मुंबई-अहमदाबाद मार्गावरील गुजराती पाट्यांबाबत राज ठाकरे यांनी भाष्य केले होते. त्यांच्या या भाषणानंतर आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी खळखट्याक आंदोलन करत रात्री उशिरा मुंबई-अहमदाबाद मार्गावरील हॉटेल-दुकानांवरील गुजराती पाट्या हटवल्या. घोषणा देत सुमारे १० ते १२ कार्यकर्त्यांनी या पाट्या हटवल्या.
 
मुंबईतील शिवाजी पार्कवर पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या चिरपरिचित आक्रमक शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरात, अभिनेता अक्षयकुमारवर हल्लाबोल केला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अजूनही अनेक दुकान आणि हॉटेलवर गुजराती पाट्या असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. त्यांच्या भाषणानंतर काही मनसैनिक एकत्रित येऊन राज ठाकरे आणि मनसेविषयी घोषणा देत या हॉटेलांवर हल्लाबोल आंदोलन केले. त्यांनी या हॉटेलवरील गुजराती भाषेतील पाट्या हटवल्या.