शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिकबंदी

राज्यात रविवारी अर्थात गुढीपाडव्यापासून प्लास्टिक पिशव्या, थर्माकोलच्या ताट, वाटय़ा, चमचे, पेले,  कप याबरोबरच जाहिरातींचे फ्लेक्स, बॅनर्स, तोरण यांच्या निर्मिती आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. आता विधानसभेत त्याची घोषणा केली जाणार आहे.
 
या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना २५ हजारांचा दंड आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. प्लास्टिक बाटल्यांचा मात्र या बंदीत समावेश झालेला नाही. तसेच दुधासारख्या पदार्थाच्या प्लास्टिक पिशव्यांचा या बंदीत समावेश नसल्याचे समजते.