सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By

गुढीपाडवा: कडुनिंबाचे महत्त्व

हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस म्हणजे वर्ष-प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. पुराणांप्रमाणे ब्रम्हदेवाने हे जग चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले आहे. तसेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो.
 
गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते. बांबूच्या टोकाला तांबडे जरीचे वस्त्र, साखरेची माळ, फुलांची माळ, कडुनिंबाचे पाने लावून त्यावर तांब्याचा लोटा ठेवला जातो. दारासमोर रांगोळी घालून अशी तयार केलेली गुढी उभी केली जाते. 

या दिवशी कडुनिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे. तसेच या दिवशी कुडुनिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही शास्त्र आहे. कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो.
 
तसेच कोवळ्या पानांमध्ये चण्याची भिजवलेली डाळ, जिरे, ओवा, हिंग, चिंच, गूळ, मीठ इत्यादी मिसळून चटणी तयार केली जाते. याचे भक्षण केल्याने शरीरात शक्तीचे कण पसरतात. शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होते. म्हणून केवळ या दिवशी कडुनिंबाचे सेवन करायचे असे नसून या दिवसापासून वर्षभर याची आठवण राहावी हे सुचविले आहेत.
 
 
कडुनिंबाची पाने, फुले, फळे, मुळे आणि खोड अशा पाच अंगांचा उपयोग होतो. पाने कडू लागतं असली तरी आपल्या गुणांमुळे गुढीपाडव्याच्या दिवशी याचे सेवन केलं जातं. याने पोटातील जंत दूर होण्यास मदत मिळते. 
 
कडुनिंबाने अंगावर उठणारी खाज व इतर त्वचेसंबंधी तक्रारी दूर होतात. तसेच वर्षभर कडुनिंब खाणे शक्य नसल्यास केवळ गुडीपाडव्यापासून दोन महिनेही याचे नियमित सेवन केले तरी वर्षभर याचा लाभ होतो.
 
एकूण आरोग्याच्या दृष्टीने कडुनिंबाचे सेवन करणे योग्यच आहे. याने रोगराई दूर होते आणि शरीर निरोगी राहतं.