शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By वेबदुनिया|

कैरीची डाळ

साहित्य : दोन वाट्या चण्याची डाळ, कैरीचा कीस अंदाजे पाव वाटी, पाच-सहा ओल्या मिरच्या, तीन-चार सुक्या मिरच्या, मीठ, साखर, कढीलिंब, ओले किंवा सुके खोबरे, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य. 

कृती : कैरीची डाळ करण्यापूर्वी चण्याची डाळ निवडून, चार तास आधी भिजत घालावी. त्यानंतर ती रोळीत उपसून घ्यावी व फडक्यावर पसरावी. नंतर ती मिक्सरमधून अर्धवट बारीक करावी. अर्धी वाटी तेलाची सुक्या मिरच्या व कढीलिंब घालून खमंग फोडणी करावी. डाळीत ओल्या मिरच्या वाटून, मीठ, साखर, कैरीचा कीस व ओले खोबरे किंवा खोबर्याचा कीस हे सर्व जिन्नस घालून वर फोडणी घालावी व चांगले कालवावे.

सौ. स्मिता जोशी