1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
  4. nighalo gheun dattachi palakhi song lyrics in Marahti

निघालो घेवून दत्ताची पालखी

Shri Datta Kshetra, Audumer
गुरुब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः
गुरुसाक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

निघालो घेवून दत्ताची पालखी, आम्ही भाग्यवान आनंद निधान
झुलते हळूच दत्ताची पालखी, निघालो घेवून दत्ताची पालखी ॥धृ॥
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
 
रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली
झुळूक कोवळी चंदनासारखी, निघालो घेवून दत्ताची पालखी
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥1॥
 
सात जन्मांची ही लाभली पुण्याई, म्हणून जाहलो पालखीचे भोई
शांतमाया मूर्ती पहाटे सारखी, निघालो घेवून दत्ताची पालखी
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥2॥
 
वाट वळणाची जीवाला या ओढी, दिसते समोर नरसोबाची वाडी
डोळियात गंगा जाहली बोलकी, निघालो घेवून दत्ताची पालखी
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥3॥
 
गीतकार - प्रवीण दवणे
संगीतकार - नंदू होनप 
गायक - अजित कडकडे
पुढील लेख
The only male river in India भारतातील एकमेव नदी जिला 'आई' नाही तर 'पिता' म्हटले जाते