शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By

येथे गुढीपाडव्याला केलं जातं रावण वध

दसरा या सणाला रावण दहन करण्याची परंपरा सर्वांनाच ज्ञात आहे. परंतू उज्जैन विभागात एक गाव असे आहे जिथे हिंदू नववर्षाची सुरुवात रावण दहनासह करण्यात येते. वर्षांपासून येथे या विचित्र परंपरेचे निर्वाह केले जात आहे.
 
दरवर्षी गुढीपाडव्याला सुमारे 5 हजार लोकसंख्या असलेल्या गाव कसारी येथे राम-रावण यांच्यात युद्ध होतं. प्रभू श्रीराम यांच्याद्वारे सोडण्यात येणार्‍या अग्निबाणाने रावणाच्या पुतळ्याचे दहन होतं.
 
शक्यतो देशातील हे पहिले असे गाव आहे जिथे नवीन वर्षात रावण दहन केलं जातं. काही वर्षापूर्वी गावकरी रावणाच्या पुतळ्याला दगड आणि काठीने वार करून वध करायचे परंतू काळ बदलला आणि मारण्याची रीतीदेखील. आता फटाके फोडत रावणाचं दहन केलं जातं.
 
गावकर्‍यांप्रमाणे रावण दहनापूर्वी अमावास्येला रात्री तलावाकाठी रामलीला मंचन केलं जातं नंतर गुढीपाडव्याला सकाळी अकरा वाजता रावण वधासाठी राम आणि रावणाची सेना युद्ध करत त्या ठिकाणी पोहचते आणि रामद्वारे रावणाच्या नाभीवर अग्निबाणाने प्रहार केला जातो.
 
कसारी गावात अशी विचित्र परंपरा आहे. आतिषबाजी झाल्यावर गावकरी एकमेकांना शुभेच्छा देतात आणि कडुलिंबाची पाने प्रसाद रूपात वाटतात. येथील ही परंपरा 50 वर्षांपेक्षाही जुनी आहे. तसेच या परंपरेला स्पष्ट मान्यता किंवा दंतकथा प्रचलित नाही.