शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By

गुढीपाडवा साजरा करण्यामागे पौराणिक कारणं

चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नव वर्षारंभ मानले जाते.
* ब्रह्म पुराणात संकेत मिळतात की या तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती. अर्थवेद आणि शतपथ ब्राह्मण यात याचा उल्लेख आहे.
* या दिवशी सर्व देवतांनी सृष्टी संचलनाचे दायित्व सांभाळले होते.
* या दिवशी प्रभू राम देवी जानकी यानांसोबत घेऊन अयोध्या परतले म्हणून विजय पताका लावून त्यांचे स्वागत करण्यात आले होते. याला ब्रह्म ध्वज असेही म्हणतात.
* विष्णू दैवताने याच दिवशी प्रथम जीव अवतार (मत्स्यावतार) घेतला होता. स्मृत कौस्तुभ मतानुसार या दिवशी * रेवती नक्षत्राच्या विष्कुंभ योग यात विषाणूंनी मत्स्यावतार घेतले होते.
* शालिवाहनाने शकांवर विजय याच दिवशी प्राप्त केली होती म्हणून शक संवत्सर प्रारंभ झाले.
* या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू पादशाहीचे भगवा विजय ध्वज लावून हिंदू साम्राज्याची नीव ठेवली होती.
* महान सम्राट विक्रमदित्य यांच्या संवत्सराचा आरंभ या दिवसापासून मानले गेले आहे.
* शक्ती संप्रदायानुसार या दिवसापासून नवरात्रीचे आरंभ होतं.
* सतयुगाचा आरंभ याच दिवशी झाला होता.