मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दोन आमदारांसह ३० जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

अहमदनगरमध्ये शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार पितापुत्र संग्राम व अरुण जगताप, तसेच भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह ३० जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आ. संग्राम जगताप व इतर काही आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. हत्येच्या प्रकारानंतर अहमदनगर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. 
 
आ. संग्राम जगताप यांना अटक केल्यानंतर, शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केली.  पोलिसांनी लाठीमार करत, २२ जणांना अटक केली़ त्यांना न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली. तर मुख्य मारेकरी संदीप गुंजाळ शनिवारी रात्री पारनेर पोलीस ठाण्यात हजर झाला त्याने हत्येची कबुली दिली.