दहा जिल्हामध्ये पूर्णपणे मोफत केमोथेरपीची सुविधा
महाराष्ट्रातील कर्करोगग्रस्तांना आता जिल्हा रुग्णालयांमध्येच पूर्णपणे मोफत केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. येत्या जून महिन्यापासून या योजनेचा पहिला टप्पा सुरु होणार असून, पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर, गडचिरोली, पुणे,अमरावती, जळगाव, नाशिक, वर्धा, सातारा, भंडारा, अकोला या दहा जिल्ह्यांमधील जिल्हा रुग्णालयांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. जून महिन्यापासून या जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये पहिल्या टप्प्यात मोफत केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल.
जिल्हा रुग्णालयात कॅन्सरवरील केमोथेरपीसाठी जी काही औषधं लागतात, ती औषधं मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून पुरवण्यात येणार असून, संबंधित डॉक्टरनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे.