बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पाण्याच्या टबमध्ये बुडून एक वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील माढा शहरामध्ये पाण्याच्या टबमध्ये बुडून चिमुरडीचा मृत्यू झालाआहे. 

दुर्वा सायबू शिंदे या एक वर्षाच्या बालिकेचे नाव आहे. सायबू मारुती शिंदे हे शिवाजीनगरमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांची सर्वात धाकटी मुलगी दुर्वा घराजवळच खेळत होती. त्यावेळी ती पाण्याने भरलेल्या टबमध्ये पडली. शेजाऱ्यांनी दुर्वाला पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दुर्वाला  तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

सायबू शिंदे हे आसपासच्या गावांमध्ये यात्रेत हातातील कडं, कानातील कुंडल अशा वस्तू विकून उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी होती.