शनिवार, 7 फेब्रुवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जानेवारी 2026 (17:53 IST)

छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते,भाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान

Chhatrapati Shivaji Maharaj was a Patidar
महाराष्ट्रात निवडणुकीपूर्व वादाचे वादळ उठले आहे. सुरत मध्ये पाटीदार समाजाकडून आयोजित केलेल्या एका कार्यक्रम बोलताना भाजपच्या मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानावर राजकारण पेटले आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरात भाजपचे नेते सी.आर.पाटील यांनी सुरत मध्ये एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते. असा दावा त्यांनी केला. त्यांच्या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून राजकीय पडसाद तीव्र उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
त्यांच्या या विधानावर शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला असून ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक आणि पद्धतशीर सुरु आहे. तर या विधानाचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील निषेध कला केला आहे. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल सर्वांना माहिती आहे. अशा प्रकारे इतिहासाचे विकृतीकरण करणारे वक्तव्य करणे चुकीचे असून हे अयोग्य आहे. 
मूळचे जळगाव जिल्ह्यातील पिंपरी अकारौत येथील असलेले सी.आर. पाटील यांचे शिक्षण आणि संपूर्ण राजकीय कारकीर्द गुजरातमध्ये घडली आहे. सुमारे 14 वर्षे पोलीस दलात सेवा बजावल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. गुजरात भाजपचे ‘चाणक्य’ मानले जाणारे पाटील सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असून या विधानामुळे भाजप पक्षाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 
Edited By - Priya Dixit