मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

इंडिगो समर सेल, विमानाचे तिकिट केवळ 999 रुपयांपासून

कमी किंमतीत विमान प्रवासाची सेवा पुरवणाऱ्या ‘इंडिगो’ने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी समर सेलची घोषणा केली आहे. ‘इंडिगो समर सेल’अंतर्गत देशांतर्गत तिकिटाचे दर केवळ 999 रुपयांपासून सुरू होत आहेत, तर, आंतरराष्ट्रीय तिकिटांचे दर 3 हजार 499 रुपयांपासून सुरू होत आहे.
 
11 जूनपासून हा सेल सुरू झाला असून 14 जूनपर्यंत याचा लाभ घेता येईल. या सेलअंतर्गत तिकिट बुक केल्यास तुम्ही 26 जून ते 28 सप्टेंबर 2019 या कालावधीत प्रवास करु शकतात. या अंतर्गत 10 लाख तिकिटांची विक्री करण्यात येणार आहे. याशिवाय इंडसइंड बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे तिकिट खरेदी केल्यास 20 टक्क्यांपर्यंत किंवा 2,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅकची ऑफरही आहे. या ऑफरसाठी किमान 4 हजार रुपयांची तिकिटं बुक करावी लागतील. तसंच जर आयसीआयसीआय बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे तिकिट खरेदी केल्यास 5 टक्के(1 हजार रुपयांपर्यंत) कॅशबॅक मिळेल, यासाठी किमान 6 हजार रुपयांची तिकिटं किंवा एक तिकिट खरेदी करणं आवश्यक आहे, आणि मोबिक्विक या अॅपद्वारे तिकिट बुक केल्यास 15 टक्के (800 रुपये तक) कॅशबॅकची ऑफरी आहे.