शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

मोफत मिळतं गॅस सिलेंडर रेग्युलेटर, एजेंसीचे नियम जाणून घ्या

गॅस सिलेंडर तर सगळेच वापरतात परंतू त्याचे नियम बहुतेकच लोकांना माहीत असतील. तर जाणून घ्या नियम- 
आपलं रेग्युलेटर चोरी झाल्यावर आपल्यासाठी एक विशेष सुविधा असते ज्या अंतर्गत आपणं एजेंसीकडून नवीन रेग्युलेटरची मागणी करू शकता. यासाठी आपल्याला पोलिसात FIR दाखल करावी लागेल आणि FIR ची कॉपी एजेंसीत जमा केल्यावर आपल्या एजेंसीकडून रेग्युलेटर मिळू शकेल.
 
आपलं रेग्युलेटर खराब झालं असल्यास देखील आपण नवीन रेग्युलेटरसाठी अप्लाय करू शकता. यासाठी देखील अतिरिक्त पैसे मोजण्याची गरज नाही. परंतू यासाठी आपल्याला सबस्क्रिप्शन व्हाऊचरची आवश्यकता पडेल. आपल्याला सबस्क्रिप्शन व्हाऊचर नंबर रेग्युलेटरहून मिळेल, आणि तेव्हाच आपल्याला नवीन रेग्युलेटर मिळू शकेल.
 
तसेच आपलं रेग्युलेटर आपल्या चुकीमुळे डॅमेज झालं असल्यास नवीन रेग्युलेटरसाठी आपल्याला एजेंसीला 150 रुपये भरावे लागू शकतात.
 
ग्राहकांच्या सुविधेसाठी आता मल्टीफंक्शनल रेग्युलेटरदेखील मिळतात. या रेग्युलेटरने सिलेंडरमध्ये किती गॅस शेष आहे हे देखील तपासता येतं.