गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

महागाईचा चटका, तूरडाळ 100 रुपये किलो

yellow Arhar Lentil
लोकसभा निवडणुका संपताच पुन्हा एकदा महागाईने डोकं वर काढलं आहे. धान्य, कडधान्यांच्या किंमतीत कमालीची वाढ झाली असून तूरडाळीचा भाव प्रतिकिलो 100 रुपये झाल्याने ग्राहकांना महागाईचे चटके बसताय. 
 
मागील दोन महिन्यांत डाळीच्या दरात प्रतिकिलो ३६ रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच मसूर, मूग आणि मटकी या कडधान्याबरोबर, शेंगदाणा, वरीच्या दरातही वाढ झाली आहे.
 
महाराष्ट्रात दुष्काळ तर काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसल्याने धान्य आणि कडधान्यांचे उत्पादन कमी झाले आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दरात सातत्याने वाढ होत आहे. तूरडाळीच्या दरात प्रतिकिलो आठ रुपये वाढ झाली असून 100 रुपये दर झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत तूरडाळीचा दर 64 रुपयांवरुन 100 रुपयांवर पोहोचला आहे. 
 
मसूरडाळ आणि मूगाच्या दरात चार रुपये प्रतिकिलो चार या दराने वाढ झाली आहे. तसेच शेंगदाण्याच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे.
 
उल्लेखनीय आहे की 2015 मध्ये दुष्काळ पडल्याने तुरीचे उत्पन्न घटले होते आणि त्यावर्षी 220 रुपये प्रतिकिलो या दराने तूरडाळीची विक्री झाली.