शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 16 मे 2019 (13:43 IST)

एमजी मोटरद्वारे भारताची पहिली इंटरनेट कार 'हेक्टर'चे अनावरण

१९ विशेष सुविधांनी सुसज्ज भारताची पहिली ४८व्ही हायब्रिड एसयुव्ही
 
१५ मे २०१९: एमजी मोटरने आज भारताची पहिली इंटरनेट कार 'हेक्टर'चे अनावरण केले.१९ विशेष सुविधांनी सुसज्ज ही भारताची पहिली ४८व्ही हायब्रिड एसयुव्ही आहे जी या श्रेणीमध्ये नवीन बेंचमार्क बनली आहे.
 
इंटरनेटने सज्ज असल्याने हेक्टरमधील पुढील पिढीचे आयस्मार्ट तंत्रज्ञान त्या श्रेणीतील सर्वोत्तम १०.४ इंच टचस्क्रीनद्वारे सुरक्षित, कनेक्टेड आणि आनंददायी अनुभव प्रदान करण्याचे आश्वासन देत आहे. ४८ व्होल्ट लिथियम-आयन बॅटरीद्वारे प्रतिष्ठित सौम्य-मिश्रित आर्किटेक्चर हे हेक्टरचे वैशिष्ट्य आहे. उत्सर्जन कमी करण्यासोबतच इंधन-कार्यक्षमता वाढण्यासाठी बनवलेले हे युनिट २० एनएम पर्यंत अतिरिक्त टॉर्क सहाय्य प्रदान करण्यास ऊर्जेचा संग्रह करते.
 
“भारताची पहिली इंटरनेट कार असलेल्या एमजी हेक्टरला उच्च प्रतिच्या स्वदेशीकरणाने बनवलेले असून ती अंतर्बाह्य पॉवर-पॅक सुविधांनी सज्ज आहे. भारतामध्ये एमजीचे पहिले सादरीकरण असल्याने हेक्टरने भारतीय ग्राहकांना सर्वोत्तम कार प्रदान करण्याच्या आमच्या प्रतिबद्धतेचे प्रदर्शन केले आहे ज्या त्यांना आवडतील,” असे एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा यांनी म्हटले आहे.
 
प्रसिद्ध स्टार-रायडर ग्रीलसहित एमजीच्या विशिष्ट डिझाइन शैलीने सुसज्जित एमजी हेक्टरने भारतात बहुप्रतिक्षित ओक्टॅगोनल बॅजचे युग आरंभ केले आहे. तिचा आकार भौमितीय आकार, क्षैतिज प्रवाह आणि सममितीने डिझाइन केलेला आहे. हेक्टरच्या अंतर्भागाचे विविध भाग आधुनिक नृत्य प्रकारांपासून प्रेरित आहेत.
 
भारतीय ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून डिझाइन आणि विकसित केलेली हेक्टर देशातील खडतर रस्त्यांवर टिकून राहण्यास सक्षम आहे. या महिन्याच्या सुरवातीला कंपनीच्या हलोल, गुजरात येथील संयंत्रामध्ये उत्पादन सुरू करण्यापूर्वी या गाडीची भारतात एक दशलक्ष किलोमीटर्सपेक्षा जास्त चाचणी घेण्यात आली आहे.
 
एमजी मोटर इंडिया ५० शहरांतील आपल्या १२० आउटलेट्सच्या व्यापक नेटवर्कदावरे पुढील काही आठवड्यांमध्ये हेक्टर रवाना करण्यास आरंभ करतील. या वर्षी सप्टेंबरच्या अखेरपर्यंत आपले नेटवर्क २५० आउटलेट्सपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. हेक्टरसाठी प्री-ऑर्डर्सची सुरवात पुढच्या महिन्यात सुरू होईल, तारखांची घोषणा पुढील काही आठवड्यांमध्ये केली जाईल.
 
हेक्टर पेट्रोल आवृत्तीला १.५ लिटर टर्बो-चार्ज पेट्रोल इंजिनची शक्ती लाभेल जे २५० एनएमच्या पीक टॉर्कवर १४३ पीएस शक्ती उत्पन्न करेल आणि मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशन अशा दोन्ही स्वरूपात कार्यरत होईल. याचे २.० लिटर डिझेल इंजिन ३५० एनएमच्या पीक टॉर्कवर १७० पीएस प्रदान करेल व सोबतच श्रेणीमधील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमताही प्रदान करेल.
 
हलोल निर्माण सुविधेची पुन्हा उभारणी करण्यास आणि हेक्टरचे उत्पादन करण्यास एमजी मोटर इंडियाने आतापर्यंत २,२०० करोड रूपयांची गुंतवणूक केलेली आहे. कंपनीने १८ महिन्यांच्या अल्प कालावधीमध्ये पूर्णपणे नवीन असेंबली लाइन, प्रेस शॉप, बॉडी शॉप, सुटे भाग वितरण केंद्र, चाचणीचा ट्रॅक आणि कारखान्यात अत्याधुनिक नवीन प्रशिक्षण केंद्र स्थापित केले आहे. एमजीच्या हलोल संयंत्रामध्ये सध्या वार्षिक ८०,००० युनिट्सची उत्पादन क्षमता आहे. कार निर्मात्यांनी त्यांच्या वाहनांच्या जलद स्वदेशीकरणासाठी आपल्या संयंत्रामध्ये एक कॅप्टीव्ह व्हेंडर पार्कही स्थापित केले आहे.
४८ व्होल्ट सौम्य मिश्रित
श्रेणीमध्ये सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता प्रदान करण्यास निवडक पेट्रोल मॅन्युअल रिम्स जागतिक पातळीवर प्रशंसित ४८ व्होल्ट सौम्य मिश्रित तंत्रज्ञानाने सुसज्जित असेल. मिश्र प्रकारांना ४८ व्होल्ट लिथियम-आयन बॅटरी ऊर्जा प्रदान करेल, जी भारतीय मास मार्केट श्रेणीमध्ये सध्या सादर प्रकारांपेक्षा चारपट जास्त सक्षम आहे. तीन मुख्य फंक्शन – इंजिन ऑटो स्टार्ट स्टॉप, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि ई-बूस्टचे संयोजन उत्सर्जन १२% पर्यंत कमी करण्यासोबतच विशेष चालक अनुभवही प्रदान करेल.
 
६-स्पीड डीसीटी
डीसीटी हे अतिशय प्रतिष्ठित व परिष्कृत ऑटोमॅटिक ट्रांसमिशन आहे जे ऊर्जा आणि इंधन किफायतशीरपणा यात अचूक संतुलन साधते. इतर प्रकारांप्रमाणेच, डीसीटीलाही जागतिक स्तरावर खडतर पर्यावरणाच्या परिस्थितींमध्ये २.६ दशलक्ष किलोमीटरपेक्षा जास्त तपासण्यात आले आहे.
 
एमजी मोटर इंडिया ही एक भविष्यासाठी सज्ज अशी कंपनी आहे जी तरूण आणि चाणाक्ष कार्यसंस्कृती आणि विविधतेमध्ये उद्योगात बेंचमार्क प्रस्थापित करीत आहे. कंपनीच्या १,२०० कर्मचाऱ्यांच्या एकूण कार्यबळामध्ये स्त्री कर्मचाऱ्यांची संख्या आधीच ३२ टक्के आहे. संशोधन, सुरक्षितता, अनुभव आणि विविधता या चार महत्वाच्या स्तंभांवर लक्ष केंद्रित करीत या कार निर्मात्याने आपल्या भविष्यातील कार्यांसाठी मजबूत पाया रचला आहे. भारतामध्ये दीर्घकाळ व्यवसाय करण्याच्या आपल्या प्रतिबद्धतेचा भाग म्हणून कंपनीने अलीकडेच १५० करोड रूपये खर्चून गुरगावमध्ये एक अत्याधुनिक कार्यालय खरेदी केले आहे.
 
एमजी मोटर इंडियाविषयी
१९२४ मध्ये युके येथे संस्थापित मॉरिस गॅरेजेस व्हेइकल्स त्यांच्या स्पोर्ट्स कार, रोडस्टर्स आणि कॅब्रिओलेट श्रृंखलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. आपल्या शैली, अभिजातता आणि भन्नाट कार्यप्रदर्शनासाठी एमजी व्हेईकल्सचे बरेच लोकप्रिय व्यक्ती चाहते आहेत, ज्यामध्ये ब्रिटिश पंतप्रधान आणि इतकेच नव्हे तर ब्रिटिश राजघराणेसुद्धा सामिल आहेत. १९३० मध्ये अबिंग्डन युके येथे स्थापित एमजी कार क्लब हा मागील ९५ वर्षांमध्ये एका आधुनिक, भविष्यवादी आणि अभिनव ब्रांडमध्ये विकसित झाला आहे. भारतीय बाजारात लवकरच आपल्या ब्रांडची वाहने सादर करण्याची योजनेसह एमजी मोटर इंडियाने हलोल गुजरात येथील आपल्या उत्पादन संयंत्रामध्ये उत्पादन कार्य सुरू केले आहे. या आधुनिक एमजी कार्सपैकी पहिली – “हेक्टर” लवकरच भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध केली जाईल.