मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मे 2019 (09:20 IST)

एअरटेलच्या 'या' ग्राहकांना मोफत लाइफ इन्शुरन्स

एअरटेल कंपनी प्रीपेड ग्राहकांना २४९ रुपयांच्या प्लानवर मोफत लाइफ इन्शुरन्स देत आहे. यासाठी कंपनीने एचडीएफसी लाइफ इन्शुरन्ससोबत करार केला आहे.यामध्ये २४९ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सना ४ लाख रुपयांचा टर्म इन्शुरन्स मोफत दिला जाणार आहे. हा प्लान पहिल्यांदाच खरेदी करत असाल तर इन्शुरन्सची सुविधा SMS द्वारा एनरोल करावी लागेल. त्याशिवाय एअरटेल अॅप किंवा दुकानातूनही या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. दुसऱ्या वेळेस रिचार्ज केल्यानंतर इन्शुरन्स स्वत:च अपडेट होतो. दुसऱ्यांदा त्याला एनरोल करण्याची आवश्यकता नसते. फ्री इन्शुरन्सचा फायदा १८ ते ५४ वर्षांपर्यंतचे यूजर्स घेऊ शकतात. या प्लानची वैधता २८ दिवस इतकी आहे. या प्लानमध्ये यूजर्सला दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. त्याशिवाय लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलही मोफत मिळणार आहे. इंन्शुरन्ससाठी कोणत्याही प्रकारच्या पेपर वर्कची आवश्यकता नाही.