बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 9 मे 2019 (15:58 IST)

एअरटेल फोर-जी हॉटस्पॉट झाला स्वस्त

टेलिकॉम क्षेत्रात सध्या जोरदार स्पर्धा सुरू आहे. भारती एअरटेलने मागील काही दिवसात आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनमध्ये बरेच बदल केले आहेत. आता एअरटेलने फोर-जी हॉटस्पॉटच्या दरामध्ये बदल केले आहेत.
 
जिओ आणि एअरटेलमध्ये फोर-जी हॉटस्पॉटमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही कंपन्यांनी जवळपास एकाच दिवशी आणि एकाच किमतीवर हॉटस्पॉट बाजारात उतरवले होते. आता एअरटेलने दरात कपात करत यूजर्ससाठी काही ऑफरही देऊ केल्या आहेत.
 
रेंटवर मिळणार  
फोर-जी हॉटस्पॉट
 
काही महिन्याआधी एअरटेलने 999 रुपयांच्या किमतीवर हा हॉटस्पॉट लाँच केला होता. एअरटेलने या स्पर्धेत पुढे राहण्यासाठी दरात कपात केली असून 399 रुपये केले आहेत.