रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 13 मे 2019 (17:31 IST)

Airtel चा नवीन प्लान, प्रीपेड यूजर्सदेखील घेऊ शकतील लाभ

आता पोस्टपेड योजनांसह प्रीपेड प्लानवर एअरटेल मोठे ऑफर देत आहे. यापूर्वी हे ऑफर्स केवळ पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होते पण आता प्रीपेड यूजर्स म्हणजेच रिचार्ज करवणार्‍या वापरकर्त्यांसाठी देखील हे उपलब्ध होईल. एअरटेल आपल्या नवीन 249 रुपयांच्या प्रीपेड योजनेत 4 लाख रुपयांपर्यंत टर्म इन्शुरन्स देत आहे.
 
एअरटेलच्या 129 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना पूर्ण वैधता दरम्यान 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतील. या योजनेची वैधता 28 दिवस आहे. यात ग्राहकांना एअरटेल टीव्ही आणि विंक म्युझिकचे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळतील. यापूर्वी ही सेवा पोस्टपेड वापरकर्त्यांनाच देण्यात येत होती.
 
आता नवीन 249 रुपयांच्या प्रीपेड योजनेत ग्राहकांना एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स किंवा भारती एक्सा कडून 4 लाखांपर्यंतचे लाईफ कव्हर मिळतील. याव्यतिरिक्त, ग्राहकांना दररोज 2 जीबी  डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतील. तसेच या योजनेत ग्राहकांना एअरटेल टीव्ही प्रिमियम सबस्क्रिप्शन, नवीन 4G फोन घेतल्यावर 2,000 रुपये कॅशबॅक, एका वर्षासाठी नॉर्टन मोबाईल सिक्योरिटी आणि विंक म्युझिकचा फ्री सबस्क्रिप्शन देखील ऑफर केले जात आहे. त्यासाठी आपल्याला दर महिन्याला रिचार्ज करणे आवश्यक आहे.